श्री. क्षेत्र गहिनीनाथ गड येथे संत वामनभाऊ महाराज यांच्या सुवर्ण पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. गहिनीनाथ गड येथील संत वामनभाऊ महाराज मंदिर परिसरात रोहिणी मिसाळ यांनी तब्बल एक हजार स्क्वेअर फुटात संत वामनभाऊ महाराज यांची अतिशय सुंदर रांगोळी मधून संत वामनभाऊ महाराज यांची प्रतिमा रेखाटली आहे. यासाठी रोहिणी मिसाळ यांना तीन दिवसाचा कालावधी लागला आहे.