शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने रोहित पवार यांची मुंबई निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. रोहित पवारांवर आता मुंबईतील पक्षाच्या निवडणूक तयारीची मोठी जबाबदारी असेल.