रोहित पवार यांनी आगामी निवडणुकांसाठी पक्षाच्या रणनीतीवर भाष्य केले. काही विशिष्ट तालुक्यांमध्ये स्थानिक उमेदवारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर इतर तालुक्यांमध्ये परिस्थितीनुसार स्वतंत्र लढण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. जिल्ह्याच्या प्रमुख नेत्यांशी सल्लामसलत करूनच हे निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.