रोहित पवारांनी पिंपरी-चिंचवडच्या राजकारणावर भाष्य करताना भाजप आणि महेश लांडगेंवर जोरदार हल्ला चढवला. अजित पवारांवरील लांडगेंच्या एकेरी उल्लेखाचा भाजपला फटका बसला, असे पवार म्हणाले. लांडगेंची दहशत आणि सत्तेचा माज भाजपला नडला, त्यामुळे भाजपची मते राष्ट्रवादीकडे वळली. जनतेने निवडणूक हाती घेतली असून, भाजप नेत्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे, असेही त्यांनी नमूद केले.