रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, ज्या 35 लोकांनी सह्या केल्या आहेत, ते अजित पवारांच्या विचारांचे आहेत. त्यांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्यासाठी काही प्रमुख पदाधिकारी आणि 5-6 नेत्यांनी सह्या का केल्या नाहीत, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावरून त्यांच्या गटात अंतर्गत मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.