पुण्यातील कोथरूड येथील मुलींना मारहाण प्रकरणी पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने महिला पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तीन युवतींना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. रोहित पवार यांनी या निर्णयाचे स्वागत करत, सहा पोलिसांसह आठ जणांवर गुन्हा दाखल झाल्याचे ट्वीट केले. वर्दीच्या बळावर बेकायदा वर्तन करणाऱ्यांची कायद्यातून सुटका झाली नाही, असे त्यांनी म्हटले.