पुण्याच्या भोर तालुक्यातील शिंद गावातील रोहित कुमकर याची भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे. सामान्य शेतकरी कुटुंबातून येऊनही त्याने कठोर परिश्रम आणि जिद्द यामुळे हे यश मिळवले. गावातील नागरिकांनी रोहितचे जल्लोषात स्वागत केले. आई-वडिलांच्या कष्टाला न्याय देत, रोहितने संपूर्ण पंचक्रोशीचे नाव उंचावले असून, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.