आषाढी वारीदरम्यान रोजगार हमी विभागातर्फे 'संवाद वारी'चे आयोजन करण्यात आले. यात 'व्ही.बी.जी. रामजी योजना'ची जनजागृती करण्यासाठी चित्ररथ आणि पथनाट्य सादर करण्यात आले. या उपक्रमाला रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी भेट देऊन कलाकारांनी सादर केलेले पथनाट्य पाहिले आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.