कल्याण पश्चिमच्या बापगाव परिसरात एक अनोखा आणि थोडासा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अंड्याच्या टेम्पोमध्ये असलेल्या अंड्याच्या ट्रेमध्ये घोणस जातीच्या सापाचं पिल्लू आढळल्याने एकच खळबळ उडाली. टेम्पोचालक आणि टेम्पो मधील ट्रे खाली करणाऱ्या कामगाराला अंड्यांच्या ट्रेमध्ये हालचाल जाणवताच दोघांनीही टेम्पो सोडून पळ काढला. या नंतर याची माहीती तातडीने स्थानिक सर्पमित्र दत्ता बोंबे यांना दिली यानंतर सर्पमित्राने घटनास्थळी धाव घेत सापाचं पिल्लू सुखरूपपणे पकडत नैसर्गिक अधिवासात सोडलं आहे.