ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. अहिर यांनी म्हटले आहे की, अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपची बी टीम आहे. निवडणुकीनंतर अजित पवारांची राष्ट्रवादी सत्तेत जाणार का, आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हे मान्य आहे का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. पुणेकरांमध्ये या राजकीय समीकरणांबाबत संभ्रम असल्याचेही अहिर यांनी नमूद केले.