सचिन अहिर यांनी सत्ताधारी आमदारांकडे मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या पैशाच्या व्यवहारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी निधी नसल्याचे सांगतानाच, कोट्यवधी रुपयांचे बंडल्स आमदारांकडे कसे येतात, अशी विचारणा त्यांनी केली. हा प्रकार वाढलेल्या भ्रष्टाचाराचे द्योतक असून, सत्ताधाऱ्यांच्याच सहभागामुळे यावर कारवाई होत नसल्याचा आरोप अहिर यांनी केला.