सचिन खरात यांनी पुणे निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली आहे. माझा कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अजित पवारांनी सन्मानजनक जागा दिल्या नाहीत हेच माघारीचे मुख्य कारण खरात यांनी सांगितले. त्यांच्या या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले असून, पुढील घडामोडींकडे लक्ष लागले आहे.