मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरला आज पालघरच्या गुहिर येथील चौथीत शिकणाऱ्या एका चिमुकल्या आदिवासी विद्यार्थिनीच्या भाषणाची भुरळ पडली. पालघरच्या वाडा तालुक्यातील गुहीर येथे आज सचिन फाउंडेशनच्या माध्यमातून 130 घरांसाठी सोलर पॅनलचा संच बसवण्यात आला. याचं उद्घाटन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सारा तेंडुलकर आणि सानिया तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सचिनच्या व्यासपीठावरील भाषणाआधी एका चिमुकल्या आदिवासी विद्यार्थिनीने भाषण केलं असून या भाषणानंतर सचिन तेंडुलकरने या चिमुकल्या विद्यार्थिनीला मिठी मारत तिचं तोंड भरून कौतुक केलं. ग्रामीण भागातील असून देखील इतक्या लहान वयात ही चिमुकली इतक्या आत्मविश्वासाने भाषण करत असल्याने याच ग्रामीण भागात पुढे देश घडवणारे तरुण तयार होतील असा विश्वास देखील तेंडुलकर यांनी यावेळी व्यक्त केला .