बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील तारापूर गावामध्ये अस्वलाचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. वन विभागाकडे अशा तक्रारी प्राप्त झाल्याने वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू पथकाकडून गावांमध्ये पिंजरा लावण्यात आला होता. अस्वल या पिंजऱ्यामध्ये अडकला आणि त्याला बेशुद्ध न करता सुरक्षितपणे अंबाबरवा अभयारण्यात मुक्त करण्यात आलं.