आषाढी वारीनिमित्त शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी आज मालेगाव शहरात दाखल होताच संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. टाळ-मृदंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या जयघोषात वारकऱ्यांचे आगमन झाले.