वर्ध्यातील खरांगणा (मोरांगणा) इथं संत काळे महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याचा समारोप झाला. पालखी, दिंडी मिरवणुकीत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग पहायला मिळाला. अनेक भाविकांनी महाराजांच्या समाधीवर चादर चढवली. तर पालखीची ठिकठिकाणी पूजासुद्धा करण्यात आलीय.