बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सखारामपूर येथून श्री संत सखाराम महाराज पायदळ दिंडी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान झाले. तब्बल १३९ वर्षांची गौरवशाली परंपरा जपत निघालेल्या या दिंडीत शेकडो वारकरी भाविक सहभागी झाले असून, सखारामपूर परिसर विठ्ठलमय झाला होता.