अभिनेता सलमान खान पापाराझींवर भडकला. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात एका जवळच्या मित्राची भेट घेतल्यानंतर तो रात्री उशिरा बाहेर पडला. यावेळी पापाराझी न थांबता त्याचे फोटो आणि व्हिडीओ काढत होते, त्याच्या चेहऱ्यावर फ्लॅश मारत होते, हे पाहून सलमानचा संताप अनावर झाला.