धाराशिव जिल्ह्यातील कसबे तडवळे येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी साकारण्यात आलेला “अघोरी महाकाल” देखावा आणि हत्तीवरील अंबारीमध्ये ठेवण्यात आलेला संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा हे मुख्य आकर्षण ठरले. या भव्य देखाव्याने ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.या मिरवणूकीत उपमुख्यमंत्री अजित पावर यांचे छायाचित्र लावून त्यांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली.कार्यक्रमादरम्यान मोठ्या संख्येने शिवभक्त आणि ग्रामस्थ उपस्थित होते.