छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू असताना एका दिव्यांग महिलेचे मडक्यांचे छोटेसे दुकान जेसीबीद्वारे जमीनदोस्त करण्यात आले. आपल्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन उद्ध्वस्त झाल्याने ही महिला भावनिक होऊन फुटलेली मडकी गोळा करताना दिसत आहे. प्रशासनाने अतिक्रमण हटवून नियमांची अंमलबजावणी केली असली तरी या कारवाईमुळे महिलेची रोजीरोटी हिरावल्याने तिच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे..