केंद्र सरकारने मोबाइल सुरक्षेसाठी संचार साथी ॲप मोबाइलमध्ये इन्स्टॉल करणे अनिवार्य केले आहे. नवीन मोबाइलमध्ये हे ॲप प्री-लोड केलेले असावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, काँग्रेसने या निर्णयाला विरोध करत, ते मागे घेण्याची मागणी केली आहे. के. सी. वेणुगोपाल यांच्या मते, हे ॲप असंवैधानिक असून पाळत ठेवण्याचे साधन आहे.