अमरावती शहरातील अर्जुननगरात मांडूळ सापाला जीवदान देण्यात आले. सर्पमित्रांनी सुरक्षित मांडूळ सापाला जंगलात सोडले. अमरावतीच्या अर्जुननगर परिसरात दुर्मिळ काळ्या रंगाच्या मांडूळ या बिनविषारी सापाला लोकवस्तीतून सर्पमित्र सचिन जवंजाळ आणि मनोज झाकर्डे यांनी पकडून सुरक्षित जंगलात सोडून त्याला जीवदान दिले.