शिरूर तालुक्यात महसूल विभाग आणि पोलिसांनी वाळू माफियांविरोधात मोठी कारवाई केली आहे. चिंचणी येथील घोड धरणात बेकायदेशीरपणे वाळूचा उपसा करणाऱ्या दोन यांत्रिक बोटी स्फोटकांनी उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.