बीडच्या आष्टी तालुक्यातील वाकी येथे असलेल्या सीना नदीच्या पात्रातून वाळू उपशाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्याचा वाळू माफियां ठ्या, कुऱ्हाडी घेऊन पाठलाग केला परंतु तो अंधारात शेतामध्ये लपून बसल्याने वाचला. दरम्यान त्या शेतकऱ्याने थेट पोलीस अधीक्षकांना फोन लावल्यानंतर एक ते दीड तासाने त्या ठिकाणी पोलिसांनी दाखल होत या शेतकऱ्याची सुटका केली. पोलीस घटनास्थळी दाखल होईपर्यंत वाळू माफीयासह त्याच्या गुंडांनी या शेतकऱ्याच्या थेट घरी जात दहशत निर्माण केली. त्या ठिकाणी असलेल्या वाटर फिल्टर प्लांट चे मोठे नुकसान केले तसेच दोन गाड्यांची तोडफोड केली.