हिंगोली- जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थान परिसरातील चंदनाचे झाड चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानातील गार्डनमधले चंदन चोरुन हिंगोली पोलिसांना चंदन तस्करांनी चॅलेन्ज दिले आहे. शहरातील साईनगर भागातील जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या निवासस्थान परिसरातील चंदनाचे झाड चोरीला गेले आहे. घटनास्थळी डॉग स्कॉड घेऊन हिंगोली पोलिसांचे पथक दाखल झाले आहे.