मनसे नेते संदीप देशपांडे यांनी बाळासाहेब ठाकरे हेच ठाकरे ब्रँड असल्याचे म्हटले. त्यांनी दोन्ही ठाकरे गटांवर टिप्पणी करत ठाकरे हे केवळ ब्रँड नसून तो एक विचार असल्याचे प्रतिपादन केले. हा विचार कधीही संपत नसतो, तर तो सतत प्रवाही राहतो, असे त्यांचे मत आहे.