सांगलीच्या कृष्णाच्या पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. कृष्णा नदीची पातळी तब्बल 19 फुटांवरती पोहोचली आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पडत असलेला पाऊस आणि जिल्ह्यात पडणारा पाऊस यामुळे कृष्णा नदीच्या पाणी मध्ये चांगलीच वाढ झाली आहे.