संगमनेर तालुक्यातील खरशिंदे गावातील 65 वर्षीय गंगुबाई गायकवाड यांच्या धाडसाची चांगलीच चर्चा होत आहे. गंगुबाई सकाळच्या सुमारास घराच्या दरवाजाजवळ असणाऱ्या चुलीवर स्वयंपाक करत असताना, अवघ्या काही फुटांच्या अंतरावरून बिबट्या थेट घरात शिरला. त्यावेळी मुलगा हरिभाऊ गायकवाड हे दरवाजालगत झोपलेले होते. गंगुबाई यांनी प्रसंगावधान राखत मुलाला बिछान्यासह बाहेर ओढले आणि मोठ्या चातुर्याने घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली.