संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी गावातील आदिवासी वाड्या-वस्त्यांवर पाण्यासाठीचा संघर्ष पाचवीला पुजला आहे.वाजेवाडी, ब्राह्मणदरा आणि मळादेवी मंदिर परिसरात सुमारे दीड हजार आदिवासींची वस्ती असून, पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना दररोज एक ते दोन किलोमीटर अंतर पार करावे लागत आहे.सकाळ-संध्याकाळ महिलांसह लहान मुले, वृद्ध आणि काही ठिकाणी अंध व्यक्तीदेखील डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी भटकताना दिसतात.