सांगली जिल्ह्यातील तोंडाला रुमाल बांधून,घरावर प्रकाश पाडून पाहणी करताना नुकतेच एक टोळके सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. रात्री दोन वाजता पाच जणांची चोरट्यांची ही टोळी फिरत असल्याचे दिसून आले. तासगाव मणेराजुरी रस्त्यावर वासूंबे गावच्या हद्दीतील दत्त कॉलनी परिसरात रविवारी रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. काही अंतरावर या चोरट्यांनी एक दुकानही फोडल्याने परिसरात घबराट पसरली आहे. पोलिसानी गस्त वाढवण्याची मागणी नागरित करत आहेत.