सांगलीच्या लिमये मळा येथे झालेल्या खुनाच्या निषेधार्थ संतप्त जमावाने पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. पोलीस अधीक्षकांना भेटण्यास पोलिसांनी विरोध केल्यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालयात जोरदार गोंधळ पहायला मिळाला. सांगलीतील लिमये मळा येथे नशेखोरांनी क्रांतीकुमार शेडबाळे यांचा खून केला होता.