सांगली-मिरज शहरासह परिसरात मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.सकाळपासून सांगलीकर उकाड्याने हैराण झाले होते.मात्र 2 वाजल्यानंतर ढगाळ वातावरण होऊन पावसाने दमदार हजेरी लावली.सांगली व मिरज शहरासह परिसरात मुसळधार असा पाऊस पडला आहे.सुमारे अर्धा तास पडलेल्या पावसामुळे शहरातल्या अनेक सखल भाग व रस्त्यावर पाणी साचले.तर अचानक पडलेल्या पावसामुळे सांगलीकरांची मात्र पुरतीच दैना उडाली. मान्सून पावसामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना दिलासा देखील मिळाला आहे.