२०२६ वर्षाची पहिली अंगारकी संकष्टी सांगलीत उत्साहात साजरी झाली. गणपती पंचायतन मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली. निवडणूक असूनही भक्तांच्या उत्साहात कमी नव्हती. आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाईने मंदिर उजळले. 'नवसाला पावणारा गणपती' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिराच्या दर्शनाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला.