सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी येथील युवा शेतकरी दीपक नांगरे यांच्या बिटल जातीच्या शेळीला तब्बल १ लाख १ हजार रुपयांचा विक्रमी दर मिळाला. म्हशीपेक्षाही अधिक दर मिळाल्याने हा व्यवहार परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. या यशामुळे शेळीपालनाचे महत्त्व आणि त्यातून मिळणारा आर्थिक नफा अधोरेखित होतो.