सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या पेठ येथे स्थानिक भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरी राज्यातील निवडणुकीतील मिळवलेल्या यशाचा आनंदोत्सव साजरा केला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये पेठनाका येथे भाजपा कार्यकर्त्यांनी पेढे वाटून तसेच फटाक्यांची आतषबाजी करीत विजयाचा आनंद व्यक्त केला.