अयोध्यातील राम मंदिर देणगी चोरी प्रकरण सांगलीमध्ये काँग्रेसकडून सत्याग्रह आंदोलन करण्यात आले आहे.सांगली मिरज रस्त्यावरील हनुमान मंदिरासमोर काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत व शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली टाळ-भजन आंदोलन करण्यात आले. राम मंदिर चोरी प्रकरणाचा निषेध नोंदवत भाजप सरकारचा निषेध नोंदवण्यात आला आहे. तातडीने याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी,अन्यथा काँग्रेसकडून पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा देण्यात आला आहे.