सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात भाजपच्या नेत्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. कामेरी जिल्हा परिषद गटातून भाजप–महायुतीकडून जयराज पाटील (दादा) यांचा उमेदवारी अर्ज मोठ्या शक्तिप्रदर्शनात दाखल करण्यात आला.