बेरोजगारी, शेती व पिण्याचा पाण्याचा प्रश्न, शैक्षणिक, आरोग्य समस्यासह विविध मागण्यांसाठी सांगलीच्या कवठेमंकाळमध्ये गाढव मोर्चा काढण्यात आला. कवठेमहांकाळ तालुक्यातल्या बेरोजगार तरुणांनी एकत्रित येत तहसील कार्यालयावर थेट गाढव घेऊन मोर्चा काढत प्रशासन व लोकप्रतिनिधींचा निषेध नोंदवला आहे.