सांगली महानगरपालिका निवडणुकीत शिंदे शिवसेनेने प्रचारासाठी अनोखा मार्ग निवडला आहे. प्रभाग १७ मध्ये वासुदेवांच्या माध्यमातून पारंपरिक पद्धतीने प्रचार केला जात आहे. संस्कृती जपत, गल्लोगल्ली जाऊन मतदारराजाशी थेट संपर्क साधला जात आहे. या हटके प्रचारामुळे शहरातील नागरिकांचे लक्ष वेधले गेले असून, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.