मिरज तालुक्यातील सोनी येते पाण्याच्या शोधात तहानलेला कोल्हा 80 फूट खोल पायऱ्या नसलेल्या विहीरीत पडला होता.चार तासांच्या प्रयत्नांनंतर बचाव पथकाने कोल्ह्याला सुरक्षितपणे विहिरीतून काढून जीवदान दिले आहे. विहिरीच्या काठावर सुटका होताच कोल्ह्याने रानात धूम ठोकली.