सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बहिरेवाडी येथे तानाजी खोत यांच्या शेतामध्ये ते पाणी पाजायला गेल्यानंतर त्यांना बिबट्यांची चार पिल्ले आढळून आली आहेत. या ठिकाणी मादी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यामध्ये ते बचावले. खोत यांनी आरडा-ओरड केल्यावर बिबट्याने धूम ठोकली. त्यानंतर खोत यांना त्यांच्या शेतामध्ये बिबट्याची चार पिल्ले आढळून आली. खोत यांनी प्राणिमित्र आणि वनविभागाला याची कल्पना दिली. यानंतर बिबट्याच्या पिल्लांना सुरक्षितपणे शेतात ठेवण्यात आले.मात्र, गावामध्ये बिबट्याचा वावर आढळल्याने भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.