सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या आरळा येथे आज हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. भाजपा आमदार संग्राम जगताप, आमदार धवलसिंह मोहिते पाटील आणि हरिभक्त पंडित संग्राम बापू भंडारे शिराळा चे स्थानिक आमदार सत्यजित देशमुख यांच्यासह हिंदुत्ववादी नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आरळा गावातून हिंदू जन आक्रोश काढण्यात आला आहे. आरळा येथील अत्याचार प्रकरणी हिंदुत्ववादी नेत्यांचसह तरुणांच्यावर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ हा हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे.