आखाती देशांमधील इराण-अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. याचा थेट फटका भारताला आणि विशेषतः महाराष्ट्रातील हॉटेल व्यवसायाला बसला आहे. व्यावसायिक एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने सांगलीसह राज्यातील अनेक शहरांत हॉटेल व्यावसायिकांनी आजपासून चक्क चुलीवर जेवण बनवण्यास सुरुवात केली आहे.