सांगली जिल्ह्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून, वाळवा तालुक्यातील कापूसखेड येथे एका रात्रीत बिबट्याने तीन पाळीव कुत्र्यांचा फडशा पाडला. सर्जेराव पाटील यांच्या कुत्र्यावर झालेल्या हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.