सांगली शहरात एका भीषण हिट अँड रन घटनेने खळबळ उडाली आहे. अनियंत्रित वाहनाने 14 ते 15 नागरिकांना धडक दिल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला असून, नागरिकांच्या आरडाओरड्याने परिस्थितीची गंभीरता दिसून येते. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.