सांगली : केमिस्ट असोसिएशन चा आज राज्यव्यापीत बंद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 4 हजार हून अधिक मेडिकल बंद आहेत. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. सांगलीच्या सिविल हॉस्पिटल शेजारी अनेक मेडिकल आहेत. ते बंद अवस्थेत आहेत. सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अनेक गोर गरीब रुग्ण दाखल असतात. या रुग्णांना बाहेरून औषध आणावी लागतात. मात्र त्याची गैरसोय होत आहे. अनेक नातेवाईक चिठ्ठ्या घेऊन फिरत आहे. मात्र मेडिकल बंद असल्यामुळे औषध मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. तर काही नातेवाईक जिल्ह्यातून येत आहेत औषध घेण्यासाठी त्यांनाही औषध मिळत नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.