सांगलीतील मिरज येथे 40 हजार रुपयांना दोन बालके दत्तक म्हणून विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताच बालकांची विक्री करण्यात आली. या प्रकरणी बालकांच्या आईसह दत्तक घेणाऱ्या आणि मध्यस्थी करणाऱ्या अशा चौघांविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांची चौकशी सुरू आहे.