सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका निवडणुकीत यंदा सहा पती-पत्नी दाम्पत्य उमेदवार म्हणून मैदानात उतरले आहेत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या प्रमुख पक्षांसह अपक्ष म्हणूनही ही दाम्पत्ये निवडणूक लढवत आहेत. पॅनल पद्धतीत पती-पत्नी एकाच पॅनलमध्ये आहेत. प्रभाग १७ मध्ये शिंदे गटाचे नानासाहेब-मयुरी शिंदे माजी महापौरांच्या विरोधात लढत आहेत. त्यांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे.