मिरज तालुक्यातील टाकळी परिसरात दहा ते वीस दिवसातून एकदा पिण्याचे पाणी येत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी टाकळी येथील संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढला. ग्रामविकास अधिकारी विजय नागरगोजे व पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे.