सांगलीच्या विटा पोलिसांनी एका वकीलावर केलेल्या कारवाईचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.वकील विशाल कुंभार यांना सात ते आठ पोलिसांनी अक्षरशः त्यांच्या घरातून उचलून पोलीस गाडीत नेऊन टाकल्याचा हा व्हिडीओ समोर आला आहे.कुंभार यांच्याबाबत घडलेल्या घटने प्रकरणी विटा वकील संघटनांच्याकडून निषेध व्यक्त करत विटा ठाण्यावर मोर्चा काढत संबंधीत अधिकऱ्यांवर कारवाईची मागणी देखील केली आहे.